खुनाची मालिका सुरूच, नाशिकरोड पाठोपाठ सातपुरलाही खून

सिडको:  दिलीपराज सोनार

शहरात खुनाची मालिकाच सुरू झाली असून, नाशिकरोड येथे भल्या पहाटे एकाचा कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना घडून सहा तास देखील उलट त नाही तोच सातपूर कॉलनी भागात खुनाची दुसरी घटना घडली. जन्मदात्या आईचा व्यसनी मुलाने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगल संतोष घोलप (65) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित म्हणून  स्वप्नील घोलप  या मुलाला ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत, शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली असतानाच गुन्हेगार मात्र पोलिसांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत आहेत, त्यामुळे पोलिसांनी आता अधिक कडक उपाय करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पाहणी केली, फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *