नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेच्या वतीने स्वर सावाना या सांस्कृतिक (सांगीतिक) कार्यक्रमाचे पंधरावे पुष्प गुंफण्यात आले. पं. शंकरराव वैरागकर व त्यांचे शिष्य यांनी या मैफलीतून शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, बंदिशी, भक्तिगीते याचे सादरीकरण केळे. गायन साथ अर्थाव वैरागकर, संवादिनी आनंद अत्रे, तबला ओंकार वैरागकर, संगीत कुलकर्णी तसेच तानपुरा संगत धनश्री सीमंत व नेहा आहेर यांनी साथ दिली. अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते प्रमुख अतिथी ज्येष्ठ वास्तुविशारद जयेंद्र पाबारी व कार्यक्रमाचे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थ सचिव गिरीश नातू यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक सहसचिव प्रशांत जुन्नरे यांनी केले. तसेच ग्रंथ सचिव देवदत्त जोशी व पुस्तक मित्रमंडळ सचिव मंगेश मालपाठक यांनी आभार मानले.
कलाकारांचा सत्कार वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधनी, प्रा. सोमनाथ मुठाळ, जयेश बर्वे, मंगेश मालपाठक यांच्या हस्ते करण्यात आला.