साप्ताहिक राशिभविष्य

दि. 19 ते 25 ऑक्टोबर 2025
पुरुषोत्तम नाईक

मेष : दिवाळी भरभराटीची
या सप्ताहात येणारी दिवाळी आपल्याला भरभराट देणारी ठरेल. अडचणी सौम्य होतील. दिवाळीच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च कराल. मात्र, झालेला गुरू बदल सावध पवित्रा घेण्याचा इशारा देत आहे. शासकीय, कोर्ट-
कचेरीच्या कामात अडचणी निर्माण होतील. कुणावरही विसंबून राहणे अडचणीचे ठरेल. नोकरदारांनी हट्टाने रजेवर जाणे टाळणे आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिकांचे धाडस यशस्वी ठरेल.
वृषभ : दिवाळी आनंदाची
या सप्ताहात येणारी दिवाळी आनंदाची ठरेल. गुरूचे कर्क राशीतील राश्यांतर अडचणी वाढविणारे ठरेल. आरोग्यप्रश्न निर्माण होतील. सतर्क राहणे गरजेचे ठरेल. आर्थिक दिलासा मिळेल. पै-पाहुण्यांची वर्दळ वाढेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नोकरदारांनी मोह टाळणे आवश्यक राहील. व्यापारी, व्यावसायिकांनी सावध भूमिका ठेवावी. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील.
मिथुन : दिवाळी मांगल्याची
या सप्ताहातील दिवाळी मांगल्याची जाईल. कर्क राशीतील गुरू बदल आशा पल्लवित करणारा ठरेल. पैशांची आवक वाढेल. अडकलेले पैसे वसूल होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना संमिश्र परिस्थिती राहील. व्यापारी, व्यावसायिकांच्या व्यवसायात नेत्रदीपक प्रगती होईल. नवीन घर, वाहन खरेदीचे योग येण्याची शक्यता आहे.
कर्क : दिवाळी उत्साह वाढविणारी
या सप्ताहात येणारी दिवाळी उत्साह वाढविणारी ठरेल. कर्केतील गुरूचे राश्यांतर दिलासा देणारे ठरेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणी भेटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. मतभेद दूर होतील. अध्यात्मात मन रमेल. आरोग्याबाबत दक्ष राहा.
सिंह : दिवाळी धनलाभाची
या सप्ताहात येणारी दिवाळी धनलाभाची ठरेल. पैशांची आवक वाढेल. पैशांचे स्त्रोत वाढतील. शासकीय कोर्ट- कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. कर्तबगारीला उधाण येईल. धाडस यशस्वी होईल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना बोनस मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्यप्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
कन्या : मन प्रसन्न करणारी दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी मन प्रसन्न करणारी ठरेल. अचानक धनलाभाचे योग येतील. पैसे हाताशी आल्याने दिवाळीची खरेदी मनजोगती व उत्साहात होईल. अचानक धनलाभाचे योग येतील. प्रेमीजनांना अनुकूलता लाभेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांची येणी वसूल होतील.


तूळ : दिवाळी मंगलदायी
या सप्ताहात येणारी दिवाळी मंगलदायी ठरेल. मनातील विचार पूर्णत्वस जातील. धाडस यशस्वी होईल. गुरूचे कलेतील राश्यांतर समस्या वाढविणारे ठरेल. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे विलंबाने होतील. वाहन जपून चालवा. दिवाळीच्या खरेदीमुळे खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी निर्णय लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल.
वृश्चिक : उत्साह वाढविणारी दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी आपला उत्साह वाढविणारी ठरेल. कर्केतील गुरूचे राश्यांतर भाग्योदयकारक ठरेल. पैशांची आवक वाढेल. मनाप्रमाणे खरेदी होईल. मुलेबाळे आनंदात दिवाळी साजरी करतील. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन जपून चालवा. प्रवास शक्यतो टाळा. कुपथ्य टाळा. प्रकृती जपा.
धनु : इच्छा पूर्ण करणारी दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी आपल्या इच्छा पूर्ण करणारी ठरेल. अचानक धनलाभाचे योग येतील. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरावर व व्यापारी, व्यावसायिकांचे उद्दिष्ट पूर्ण होईल. कौटुंबिक वादविवाद सौम्य होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. भाऊंबदकीतील गैरसमज दूर होतील. प्रकृती सांभाळा.
मकर : लाभ घडविणारी दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी आप्तेष्टांमधील प्रेम वाढविणारी ठरेल. दिवाळी उत्साहात साजरी कराल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे वहीपूजन थाटात व उत्साहात पार पडेल. शेअरमध्ये लाभ होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. अविवाहितांचे विवाह जमतील.
कुंभ : सन्मान प्राप्तीची दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी मंगलवार्ता देणारी असेल. आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल. खर्च वाढतील. साडेसातीतून थोडा विरंगुळा मिळेल. नोकरदारांच्या कष्टांचे कौतुक होईल. सन्मानप्राप्तीचे योग येतील. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कानी पडतील. शेअरमध्ये गुंतवणूक करणे लांबणीवर टाका. प्रकृती सांभाळा.
मीन : यश देणारी दिवाळी
या सप्ताहात येणारी दिवाळी नवीन कार्यात यश देणारी ठरेल. गुरूचे कलेतील राश्यांतर सुखवार्ता देणारे ठरेल. प्रवास मात्र टाळा. त्यामुळे त्रास होऊ शकतो. वाहन जपून चालवा. नोकरदारांना बढती बदलीचे योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेणे टाळावे. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *