आधी पतीने सोडले..मग अपत्य झाल्यावर प्रियकरानेही झिडकारले…इंदिरानगरच्या पीडितेची अशीही व्यथा

इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडको विशेष प्रतिनिधी:-सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या संशयित मयूर युवराज कछवे (रा. जत्रा हॉटेलजवळ, आडगाव, नाशिक) याच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना अपत्य झाल्यानंतरही संशयिताने लग्न करण्यास नकार देत फिर्यादी, त्यांची मुलगी आणि भाऊ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर केवळ वर्षभरातच त्यांचे पती त्यांना नाशिकमध्ये एकट्या सोडून मुळगावी निघून गेले. त्यानंतर त्या मैत्रिणीसोबत राहत होत्या. या काळात त्यांची ओळख मयूर युवराज कछवे याच्यासोबत एका सोशल मीडिया साईटवर झाली. त्यानंतर मयूरने फिर्यादींना इंदिरानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.

दरम्यान, संशयित मयूर हा अनेकदा मद्यप्राशन करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. फिर्यादींनी नकार दिल्यास त्याने मारहाण केली. या संबंधातून फिर्यादींना एक अपत्य झाले. त्यानंतर त्यांनी मयूरला लग्न व जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली असता, मयूरने लग्नास नकार देत पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

फिर्यादींना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून इंदिरानगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *