पुण्यात भीषण अपघातात आठ जणांचा करुण अंत

नवले ब्रीजवरील घटना : गाड्यांनी घेतला पेट

पुणे :
नवले पुलावर काल गुरुवारी (दि. 13) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे सात ते आठ वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात सुमारे पंधरा ते वीस वाहनांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती
मिळत आहे.
सातार्‍याकडून पुण्याकडे येणार्‍या महामार्गावर भुमकर पुलाजवळील कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हलर बस उलटली असून, त्यामध्ये 18 ते 20 प्रवासी होते. सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, पुढे असलेल्या एका सीएनजी कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली. धडकेनंतर कारला पेट लागला आणि काही क्षणांतच आगीने भयंकर रूप धारण केले. कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती मिळाली .

असा अपघात घडला?
प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक सातार्‍याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पॉइंटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटेनरला धडक दिली. या दुर्घटनेनंतर पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवून नागरिकांना त्या मार्गावरून जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *