ठाकरेंच्या या नेत्याने सोडली मशाल, हाती घेणार कमळ
नाशिक: प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांना एका मागून एक धक्के बसतच असून, आता मालेगाव मधील प्रशांत दादा हिरे यांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनीही शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते मुंबईत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आले. यापूर्वी ते भाजपा मधेच होते. परंतु मधल्या काळात त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मालेगाव तालुक्यातील हिरे घराणे एकेकाळी राजकारणात अग्रेसर मानले जात, परंतु मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. आता ते पुन्हा भाजपात जात असल्याने आगामी काळात मालेगावच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.