आरोपीला फाशी देण्याची मागणी; ग्रामस्थांचा रास्ता रोको
मालेगाव : प्रतिनिधी
डोंगराळे (ता.मालेगाव) येथे रविवारी (दि.16) तीनवर्षीय बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला गावातच फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि.17) मालेगाव-कुसुंबा महामार्गावर रास्ता रोको केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आरोपी विजय खैरनार याला न्यायालयात उभे केले असता, त्यास 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात
आली.
रविवारी सायंकाळी बालिका घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत असताना आरोपी विजय खैरनार याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत सोबत नेले. त्यानंतर बालिका अचानक बेपत्ता झाल्याने बालिका तीन तासांपासून घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांसह तिचा शोध घेण्यास सुरू केला. शोधमोहीम सुरू असतानाच या प्रकरणाची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना देण्यात आली. संध्याकाळी उशिरा जिल्हा परिषद शाळेजवळील मोबाइल टॉवरच्या परिसरात बालिकेचा मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या स्थितीतून तिच्यावर अत्याचार करून नंतर दगडाने ठेचून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश केला व ग्रामस्थांमध्ये संताप उसळला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, सहायक पोलीस उपअधीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान खेळणार्या मुलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विजय खैरनारला ताब्यात घेत अटक केली. रात्री उशिरापर्यंत मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रारंभी मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालय आणण्यात आला होता. ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने या चिमुकलीचा मृतदेह रात्रीच नाशिक येथे विच्छेदनासाठी पाठवला. या शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले गेले आहे. ही अमानुष घटना संपूर्ण तालुक्याला हादरवून सोडणारी असून या निष्पाप बालिकेच्या हत्येमुळे संताप व्यक्त होत असून आरोपीला गावातच फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव-कुसूंबा महामार्ग रोखून धरला. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री भुसे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई आणि तपास जलदगतीने होईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
डोंगराळे येथे झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेची मुख्यमंत्र्यांसह राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या चित्रा वाघ, शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्हे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून घटनेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
HANGED UNTIL DEATH Te pan sarva samor dhyavi khup santap hotoy MLA DADA BHUSHE Saheb yani Vishay hatalala aahe tar Ek ghav 2Tukade Honar khatri aahe JAI SHIVAJI JAI BHAVANI
JAI MAHARASHTRA