नाशिक: प्रतिनिधी
सप्तश्रृंग गड येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. पिंपळगाव बसवंत येथील इनोव्हा कार ने सात जण गडावर दर्शनाला गेले होते. मात्र कार कोसळल्याने सात पैकी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवाशी होते. त्यापैकी मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिक यांची मदत घेतली जात आहे.
*पहा अपघाताचा व्हिडीओ*
https://youtube.com/shorts/inqmGPiU5vk?si=y62d-oU8VviS7JNR