नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ मार्गात होणार बदल

पुणे :
नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन (अलायनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
श्री. फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, नागपूर- गोवा द्रुतगती मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. त्याचं नाव जरी नागपूर- गोवा असलं तरीदेखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल आणि यासंदर्भात मागच्या काळामध्ये लोकांचे काही आक्षेप आले होते. विशेषत: लोकांचा एक आक्षेप होता तो खरा होता की, आपण जी अलायनमेंट फॉलो केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली. सोलापूरपासून आपली अलायनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात. ग्रीनफील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातात आणि तिथे विकास होतो, म्हणून जयकुमार गोरे आणि सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासून एक वेगळी नवीन अलायनमेंट आम्ही तयार केली आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. पुढे ते म्हणाले की, वेगळी नवीन अलायनमेंट ही चंदगडपासून सोलापूर, सांगलीपासून जाते, पंढरपूरजवळून तो मार्ग जाईल. आधी जॉईंट मेजरमेंट केले आहे. त्याचे संपादन आपण चालू केलेले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली
आहे. शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे. मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांंमधून नेण्यात येईल, ज्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *