मुंबई: मुंबईसह राज्यातील29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत तारखा घोषित केल्या, मुंबईत एक सदस्य तर इतर महापालिकेत बहू सदस्य प्रभाग नुसार निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 पासून सुरू होणार आहे.30 तारखेपर्यंत अर्ज विक्री व स्वीकृती आणि 31 ला छाननी होणार आहे. 2 जानेवारी 2026 ला मागार, 3 जानेवारी ला अंतिम उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. प्रचारासाठी अवघे 10 ते 12 दिवस मिळणार आहेत.
*राज्यातील एकूण जागा….२८६९
२९ महानगरपालिका आचारसंहिता आजपासून लागू
*असे आहे वेळापत्रक*
नामनिर्देशन अर्ज – २३ ते ३० डिसेंबर.
छाननी- ३१ डिसेंबर २०२५.
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६.
निवडणूक चिन्ह – ३ जानेवारी २०२६.
मतदान दिनांक- १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६