नाशिक: प्रतिनिधी
सदनिका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे अटकेची टांगती तलवार असलेल्या राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपद मिळाल्या पासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या कोकाटे यांचे मंत्रिपद अवघ्या काही महिन्याचे राहिले, प्रारंभी कृषिमंत्री झालेल्या कोकाटे यांनी शेतकाऱ्यांविषयी वादग्रस्त विधाने केले होते. त्यात त्यांना सदनिका प्रकरणांत 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु या शिक्षेला त्यांनी आव्हान दिल्याने त्यांचे मंत्रिपद वाचले होते. तथापि, मंगळवारी सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली, आज सकाळी न्यायालयाने त्यांच्या अटकेचे वारन्ट काढल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्यापूर्वी च ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. कोकाटे यांना शिक्ष झाल्याने आता त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे.