बक्षिसांची लयलूट; 35 सायकलींसह रोख रकमेचे वाटप

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील जागृत देवस्थान रेणुकामाता यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवाच्या तिसर्या दिवशी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य अशा घोडा-बैल शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतींमध्ये नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक घोडा-बैल शौकीन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शर्यतींमुळे यात्रास्थळी मोठी गर्दी उसळली होती. या स्पर्धेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या वतीने दहा सायकली व शेतकर्यांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. विलास सानप यांच्या वतीने पाच सायकली, सरपंच पती दीपक बर्के यांच्या वतीने दोन सायकली, सोमनाथ सांगळे यांच्या वतीने एक सायकल तर योगेश शेळके यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली. अशा प्रकारे एकूण 35 सायकलींसह रोख रक्कम विजेत्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आली.
याशिवाय प्रत्येक टांगा शर्यतधारकाला यात्रा कमिटीच्या वतीने एक सायकल व रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. या भव्य शर्यतींचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
रेणुकामाता यात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या घोडा-बैल शर्यतींमुळे यात्रेची रंगत अधिकच वाढली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
The thrill of horse and bull racing on the occasion of Renuka Mata Yatrotsav