सिडकोत शाब्दिक वादानंतर हाणामारी

बिरारी-शिरसाठ भिडले

सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको भागात माघारीच्या अखेरच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. अर्ज माघारीवरून थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले.
प्रभाग क्रमांक 31 मध्ये शुक्रवारी (दि.2) उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेदरम्यान गोंधळाची घटना घडली. या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार बाळकृष्ण शिरसाठ सिडको विभागीय कार्यालयात दाखल झाले असता, भाजपकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे पत्नीसमवेत उमेदवारी माघारी घेण्यासाठी तेथे आले होते. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्याने क्षणातच परिस्थिती हाताबाहेर जाऊन हातापायापर्यंत पोहोचली.
कार्यालय परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना वेगळे केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनुचित प्रकार टळला.
या घटनेमुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांची माहिती घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली नव्हती.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या पाश्वर्र्भूमीवर संयम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे निवडणूक वातावरण बिघडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Brawl breaks out after verbal argument at CIDCO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *