शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ

नाशिक : वार्ताहर
नाशिक शहर परिसरात दुचाकी , चारचाकीसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . १ एप्रिल ते १७ मे या १७ दिवसांच्या कालावधीत घरफोडी आणि चोरीच्या ५० गुन्ह्यांत तब्बल १ कोटी १४ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे . नाशिक शहर परिसरात घरफोडी , चेन स्नॅचिंग , चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे . उघड्या घरातून आणि बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरी व घरफोडीचे गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे . उपनगर , पंचवटी , अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे गुन्हा घडले आहेत . ५० घरफोडी आणि चोरीच्या
गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . ज्यात पंचवटी – आडगाव – ४ , ६ , गंगापूर – २ , मुंबई नाका- ५ , म्हसरूळ – २ , – सरकारवाडा – ४ , रोड- ३ , नाशिक उपनगर – ७ , देवळाली कॅम्प – ३ , – – अंबड – ६ , सातपूर – ४ , इंदिरानगर २ अशी गुन्ह्यांची नोंद नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे . पोलिसांकडून शहरातील महत्त्वाच्या भागात दररोज बॅरिकेडिंग करत वाहनांची तपासणी केली जात आहे . घरफोडीसह चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे . यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *