प्रभाग एकमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहणार

मतदार पुन्हा भाजपा उमेदवारांना निवडून देणार

पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग एकमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहणार असल्याची भावना मतदारांकडून प्रचार दौर्‍यादरम्यान ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रभाग एकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या उमेदवारांनी या भागात अनेक मोठी विकासकामे केली असून, त्या माध्यमातून परिसराचा कायापालट होताना दिसून येत आहे. त्यामुळे हा विकास अविरतपणे सुरू राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांनी केल्याचे दिसून
येत आहे.
प्रभाग 1 मधील माजी नगरसेवक अरुण पवार, माजी महापौर रंजना मानसी व माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या माध्यमातून प्रभागात पेठ रोड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, सातशेहून अधिक आसनव्यवस्था असणारी भव्य तीन मजली ई-लर्निंग अभ्यासिका, क्रिकेट टर्फ, नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन, उद्यानांची निर्मिती, कॉलनी रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरण, समाजमंदिरांची व सभामंडपाची उभारणी अशा प्रकारची विविध विकासकामे प्रभागात करण्यात आली असून, यामुळे प्रभागातील नागरिक समाधानी असल्याची भावना व्यक्त करत आहे. तसेच यंदाही पुन्हा भाजपाच्या रूपाली स्वप्नील ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गिते, अरुण बाबूराव पवार या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देणार असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली आहे.

प्रभागात केलेल्या विकासकामांवर नागरिक समाधानी असल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय. त्यामुळे चारही उमेदवार सहजपणे निवडून येतील. – रंजना भानसी

या भागात प्रचार दौरा

दिंडोरी रोडवरील प्रभातनगर प्रचार दौर्‍याला सुरुवात करण्यात आली. पुढे वाढणे कॉलनी, केतकीनगर, श्रीरामनगर, वरदनगर, कन्सारा माता मंदिर परिसर, आश्रमशाळा परिसर, अवतार पॉइंट या मार्गावर प्रचार दौरा झाला. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत केले, तर महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष, आमदार
चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत प्रभाग एकमध्ये रॅलीचे आयोजन शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले असून, रॅलीची सुरुवात आरटीओ कॉर्नर येथून होणार असून, पुढे ओंकार बंगला, मा. ए. टी. पवार आश्रमशाळा, केतकी सोसायटी, वडाचे झाड, म्हसरूळ गाव, भाजीमंडई, जिजामाता चौक, बालाजी चौक, ममता स्वीट्स, राजमाता मंगल कार्यालय, आरटीओ कॉर्नर येथून मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे रॅलीची सांगता
होणार आहे.

The flow of development will continue unabated in Ward One.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *