समस्यामुक्त, भयमुक्त प्रभागासाठी शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पसंती
पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर समस्या असून, नागरिकांना धड रस्ते चालायला नाहीत. मुख्य रस्त्यांची वाट लागली आहे. याकडे दुर्लक्ष झालेले असताना प्रभागातील नागरिकांना समस्यामुक्त प्रभाग करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार (अ) इंदुमती भोये (खोसकर), (ब) दामोदर अण्णा मानकर (क), सुनीता पिंगळे (ड), प्रमोद पालवे याच उमेदवारांची गरज आहे.
प्रभागातील मोरे मळा आणि विविध भागात प्रचार केला तेव्हा सर्वच ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रभाग क्रमांक सहामधील सर्वच उमेदवार अनुभवी आणि सुशिक्षित असून, माजी नगरसेवक दामोदर अण्णा मानकर हे दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत. तसेच गेल्या चाळीस वर्षांपासून समाजसेवा प्रतिष्ठित अशा व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि दानशूर असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी गावात 12 वर्षांपूर्वी प्रभागासाठी मोफत वैकुंठ व रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्याचप्रमाणे 2021 मध्ये कोल्हापूर येथील महापुरातील पूरग्रस्त 300 कुटुंबांना शिधावाटप केला होता. याशिवाय 1989 मध्ये श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नारायणराव मानकर प्रायमरी स्कूलला विनामोबदला अशी जागा दिली आहे. तसेच जिजाई फाउंंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे हेही सुशिक्षित व व्यावसायिक असून, त्यांनाही समस्यांची जाणीव आहे. कुठलेही पद नसताना त्यांच्याकडे कोणीही गेला तरी प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन उभे केले होते. सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवणे, मतदान नोंदणी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
माजी नगरसेविका सुनीता पिंगळे यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. प्रशासकराज असतानाही कायम नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. इतके असतानाही त्यांच्यावर झालेला अन्याय हा मतदारांना न पटणारा आहे.त्यामुळे मतदारांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे मतदारदेखील त्यांना न्याय देणार आहे.
तर आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती भोये (खोसकर) यांनी 2012 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कामकाज बघितले आहे. घरातील राजकीय वारसा असल्याने त्यांना काम करून घ्यायचा अनुभव असून, प्रभागाच्या विकासासाठी आमदार खोसकर यांचाही अनुभव उपयोगात येणार असल्याने मतदारांनीदेखील याच उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवणार असल्याचा निश्चय
केला आहे.
स्वामी समर्थ केंद्रात आरती
प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार इंदुमती भोये (खोसकर), दामोदर अण्णा मानकर, सुनीता पिंगळे, प्रमोद पालवे या उमेदवारांच्या हस्ते मखमलाबाद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आरती करण्यात आली. यावेळी केंद्रातील सेवेकर्यांनी उमेदवारांचे स्वागत करत सद्गुरू स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी राहील, असे सांगितले.
Spontaneous response from voters in Hanumanwadi, More Mall