प्रभाग दोन समस्यामुक्त करण्यासाठी जनता शिवसेना-राष्ट्रवादीसोबत

प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग दोनमधील नागरिक गेल्या पाच वर्षांत समस्यांनी त्रस्त झाले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारची कामे न केल्याने आजही नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील कॉलनी रस्ते, पाण्याची समस्या अशा मूलभूत गरजा मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले होते. तर लोकप्रतिनिधी नसतानाही अतुल दादा मते, रवींद्र जाधव, अश्विनी बागूल, कविता अंडे यांनी सातत्याने प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे यावेळी नव्या दमाला मतदार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून, प्रभाग दोन समस्यामुक्त करण्यासाठी नव्या दमाच्या उमेदवारांना पसंती देताना दिसत आहेत. तर स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) व शिवसेना (शिंदे गट) युतीचे अधिकृत उमेदवार अश्विनी बागूल (अ), कविता अंडे (ब), रवींद्र जाधव (क), अतुल दादा मते (ड) यांचा प्रचार जोमाने प्रारंभ झाला आहे. त्यांना प्रभागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
देत आहेत.
गेल्या सात ते आठ वर्षांत प्रभागात कुठलीही अशी ठोस कामे झाली नाहीत. प्रभागाचा परिसर मोठ्या प्रमाणात असून, आडगाव, नांदूर, मानूर यांसारख्या खेड्यांचा समावेश असल्याने मळे परिसर मोठ्या प्रमाणात आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जे रस्ते झाले होते, त्यांची दुरुस्तीसुद्धा झाली नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी तत्कालीन नगरसेवकांनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सोयीसुविधांपासून भरडलेल्या मतदारांना न्याय देण्यासाठी व सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी अतुल दादा मते, रवींद्र जाधव, अश्विनी बागूल, कविता अंडे तुमचीच गरज असल्याचे ठिकठिकाणी नागरिक या उमेदवारांना सांगत आहेत. या उमेदवारांनी सकाळी शिवसेनेचे नेते स्वर्गीय निवृत्ती मते यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील उमेदवारांना प्रतिसाद देत आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
तसेच सकाळी शरयू पार्क, जत्रा हॉटेल परिसर, श्रीरामनगर, संकेलचा गार्डन क्राउंटी या ठिकाणी सायंकाळी जवळपास 400 ते 500 मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *