Live : नाशिकमधील सत्तासंघर्ष, हे उमेदवार आघाडीवर

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी मतमोजणी ला सुरुवात झाली असून, सकळी 10 वाजता पोस्टल मतदानाच्या मत मोजणीला प्रारंभ झाला आहे. हाय व्होल्टेज लढतीत कुणाची सरशी होते हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.नाशिकमध्ये भाजपा, शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे.

प्रभाग  17,18,19 मध्ये मतमोजणी सुरू झाली आहे.

सातपूर भागातून दिनकर पाटील आघाडीवर

प्रभाग 9 मधून दिनकर पाटील अमोल पाटील या पिता पुत्रांनी टपाली अघाडीवर आहेत.

इचलकरंजी त भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

पोलीस आयुक्त यांची भेट

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सातपूर क्लब हाऊस येथील मतमोजणी केंद्राला भेट देत आढावा घेतला

प्रभाग 15 मध्ये भाजपचे तीनही उमेदवार आघाडीवर

प्रभाग 15 मध्ये भाजपचे तिन्ही उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. मिलिंद भालेराव, अर्चना थोरात, सचिन मराठे यांनी आघाडी घेतली आहे.

अजय बोरस्ते आघाडीवर

, पोस्टल मतांत अजय बोरस्ते आघाडीवर:
नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी काल (दि. १५) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. आज (दि. १६) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून शहरातील विविध मतमोजणी केंद्रांवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
प्रभाग क्रमांक ७, १२ आणि २४ यांची मतमोजणी दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी दहा वाजता सुरू झाली आहे मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतमोजणीत एकूण ६८ मतदान झाले असून त्यापैकी ४० मतांवर अजय बोरस्ते यांनी आघाडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रभाग 25,26,28 मध्ये हे उमेदवार आघाडीवर

सिडको परिसरातील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात प्रभाग क्रमांक 25 26 आणि 28 प्रभागाचे मतमोजणी सुरू आहे
सिडकोतील प्रभाग क्रमांक 25 साठी 66 बुथ ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये चार फेऱ्यांच्या माध्यमातून निकाल जाहीर करण्यात येणार आहे एका फेरीमध्ये 21 टेबल ठेवण्यात आलेले आहे
टपली मतदानामध्ये
अ गटात
सुधाकर बडगुजर 63
ॲडवोकेट अतुल सानप 15
ब गटामध्ये
साधना मटाले 51
शोभना शिंदे 21
क गटामध्ये
कविता नाईक 38
भाग्यश्री ढोमसे 32
ड मुरलीधर तात्या भामरे 36
प्रकाश अमृतकर 17
अनिल मटाले 19

प्रभाग : 14

अ : गांगुर्डे : राष्ट्रवादी ब : बुशरा आसिफ : राष्ट्रवादी, क : समिया सुमेर : काँग्रेस,ड : सुफी जीन : काँग्रेस या उमेदवारांनी आघाडी घेतली.

पंचवटीत मतमोजणी संथ गतीने

पंचवटी मधील एक ते सहा प्रभागाच्या मतमोजणीला प्रचंड उशीर होत आहे. निवडणूक अधिकारी आणि मतमोजणी कर्मचारी यांच्यात संगणमत नाही

मतदान मतमोजणी 13,14 आणि 15

 प्रभाग 13 (पहिली फेरी)

अ : रश्मी भोसले(शिंदेसेना) : 1296 ( 601 मतांनी पुढे )
वत्सला खैरे (काँग्रेस) : 326
अदिती पांडे (भाजपा) : 695
—-
ब : मयुरी पवार (मनसे) 641
सुवर्णा मोरे (शिंदेसेना) 836
हितेश वाघ (भाजप) 873 ( 37 मतांनी पुढे )

क : संजय चव्हाण (उबाठा) 475
दीपक डोके (शिंदेसेना) 508
राहुल शेलार (भाजप) 1029( 521 मतांनी पुढे )

ड : गणेश मोरे (शिंदेसेना) : 1296 (539 मतांनी पुढे)
शाहू खैरे(भाजप) 757
जयेश बर्वे (उबाठा) 247

प्रभाग 14 (पहिली फेरी )
अ : जागृती गांगुर्डे (रा. अजित): 909 (245 मतांनी पुढे)
दिगबरं नाडे (काँग्रेस): 664
संजय साबळे(रा. शरद पवार) : 389


प्रभाग 10

प्रभाग 10 मध्ये पहिल्या फेरीत इंदूबाई नागरे, फरीदा शेख यांनी आघाडी घेतली असून, दिनकर पाटील, विलास शिंदे हे देखील आघाडीवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *