वीज मीटरमध्ये फेरफार प्रकरणी गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर परिसरात दीर्घकाळ वीज चोरी केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा पुढील तपासासाठी सातपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी हेमंत यशवंत ठोसरे (वय 50, व्यवसाय नोकरी), अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भरारी पथक, मालेगाव यांनी फिर्याद दिली आहे. ते जुने पावर हाउस, मालेगाव, जि. नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, संतोष रामदुलार विश्वकर्मा (रा. घर क्रमांक 1, श्री स्वामी समर्थ रो बंगला, शिव कॉलनी, सातपूर, नाशिक) यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
भरारी पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान 15 जुलै 2019 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत संबंधित वीजग्राहकाने वीज मीटरमध्ये बेकायदेशीर फेरफार करून एकूण 17 हजार 315 युनिट्स वीज अप्रमाणिकपणे वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. या वीज चोरीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सुमारे 3 लाख 50 हजार 400 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदरची घटना 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास घर क्रमांक 1, श्री स्वामी समर्थ रो बंगला, शिव कॉलनी, सातपूर, नाशिक येथे उघडकीस आली. त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची नोंद तपासात आढळून आली आहे. वीज चोरीचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी सातपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, तेथील पोलीस अधिक तपास
करीत आहेत.

Case registered in electricity meter tampering case

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *