दि. 18 ते 24 जानेवारी 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : गुंतवणूक सावधपणे करा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची कामे पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामांना विलंब लागेल. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. आरोग्यप्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. पैशांचे नवीन स्त्रोत सुरू होतील. नोकरदारांनी कामात दुर्लक्ष करू नये. व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. नवीन वास्तू, नवीन घराणेशाहीची कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : सतर्क रहा
या सप्ताहात शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांवर कामाचा ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांनी व्यवहारात दक्ष रहावे. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, प्रकृतीची योग्य काळजी घेणे आवश्यक राहील.
कर्क : प्रगती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची व व्यापारी व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामांना दिरंगाई होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. पथ्य पाळा.
सिंह : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. नोकरदारांना विरोधकांचा उपद्रव जाणवेल. व्यापारी, व्यावसायिकांनी सावध भूमिका ठेवावी. शासकीय, कोर्ट, कचेरीया कामात यशप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढेल. नोकरदारांच्या अडीअडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ : कुणावर विसंबू नका
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदार एखाद्या षडयंत्रात फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून काम करू नये. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. सन्मानप्राप्ती होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
धनु : पैसे वसूल होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे पैसे वसूल होतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल.
मकर : पैसे मिळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू, रवी प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या व व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या.
कुंभ : समिकरणे चुकतील
या सप्ताहात गुरू अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. घेणेकरी, सावकार, बँका तगादे लावतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे समिकरणे चुकतील. प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : आर्थिक परिस्थिती संमिश्र
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक समृध्दी वाढेल. मानसन्मानाचे योग येतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope