जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरेपर्यंत अविश्रांत धडपड करीत असतो.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याची ही धडपड चालतच असते.अशी अविश्रांत धडपड करणार्या माणसाला विचार करण्यास वेळच सापडत नाही.त्यामुळे या माणसाची विचार करण्याची शक्तीच दिवसेंदिवस कमकुवत होत जाते.
विचार करण्यासाठी माणसाल कुठेतरी थांबावे लागते.जो थांबू शकतो तोच निवांतपणे विचार करू शकतो आणि जो निवांतपणे विचार करू शकतो त्यालाच जीवनात नवे नवे मार्ग दिसू लागतात.ज्याला जीवनात सुखी व्हायचे असेल त्याला जीवनात निरनिराळ्या कारणांसाठी धावत असताना थांबायचे कुठे?फ हे समजले पाहिजे.सर्वसामान्य लोकांना थांबायचे कुठे?फ हेच समजत नाही.अशा लोकांच्या वाट्याला अशांत,अयशस्वी,संतप्त व दुःखी जीवन येते.पैसा-सत्ता-संपत्ती किंवा मान-सन्मान कीर्ती यासाठी बहुतेक लोक जिवापाड राबत असतात.त्याच प्रमाणे मुलांना,नातवंडांना पैशाची व इतर कशाचीही कमतरता कधीच पडू नये अशी त्यांची धारणा असते.
या मोहापायी हे लोक मिळेल त्या अनिष्ट मार्गानी पैसा मिळवीत असतात.या सर्व धडपडीत हे लोक एक दिवस मरामम म्हणतात व त्यांनी मिळविलेला पैसा त्यांच्या मुलांच्या व नातवंडांच्या हातात अलगद येऊन पडतो.अनिष्ट मार्गानी मिळविलेला पैसा कोणालाच लाभत किंवा पचत नसतो.शिवाय अनिष्ट मार्गानी संपत्ती व पैसा मिळविताना या लोकांना सतत मानसिक ताण (ढशपीळेप) सहन करावा लागतो.मानसिक ताण-तणावामुळे या लोकांच्या शरीरावर व मेंदूवर परिणाम होऊन त्यांना अल्सर,रक्तदाब,मधुमेह, पक्षघात,मानसिक रोग वगैरे नाना प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते.व मेंदूवर परिणाम झाल्यामुळे मनःस्ताप होऊन व मनःशांती हरवून त्यांची भ्रमिष्टासारखी अवस्था होते.त्याचप्रमाणे मुलांच्या व नातवंडांच्या हातात विनासायास संपत्ती व पैसा आल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होते.मौज-मजा,चैन-चंगळ करण्यात व विविध व्यसनापायी सर्व पैसा ते खर्च करून टाकतात व प्रसंगी पैसा,संपत्तीसाठी कोर्ट कचेर्या किंवा खून,मारामार्या सुद्धा करतात. या सर्व उलाढालीत या लोकांची मुले व नातवंडे अक्षरश:कफलुक व कर्जबाजारी होतात व प्रसंगी जीवही गमावून बसतात.म्हणून पैसा मिळविताना माणसाने मकुठे थांबले पाहिजेफ हे त्याला कळणे आवश्यक आहे.बापाने मुलांसाठी अमर्याद पैसा मिळवित रहाणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे.बापाने फक्त मुलांसाठी (नातवंडांसाठी नाही) मर्यादित पैसा मिळवावा.याचा अर्थ असा की,बापाने मुलांना आवश्यक ते शिक्षण द्यावे व थोडाफार पैसा जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ठेवावा.फथांबायचे नेमके ठिकाण हेचफ, हे संपत्ती व पैसा मिळविणार्यांनी लक्षात ठेवणे त्यांच्या व समाजाच्या हिताचे आहे.त्याचप्रमाणे कित्येक लोकांना वर्षा-वर्षाला संतती प्राप्त होत असते.फप्रत्येक वर्षाला एक कॅलेंडरफ अशी कित्येक लोकांची परिस्थिती असते.या लोकांना कुठे थांबावे हेच कळत नाही.फदेवाच्या कृपेने ही संतती होत असते व संतती प्रतिबंधक उपाय योजना करणे म्हणजे पाप,फअशी त्यांची प्रामाणिक समजूत असते व त्या त्या धर्मांतील अंधश्रद्धाधीन व स्वार्थी राजकीय पुढारी व धर्ममार्तंड सुद्धा त्या लोकांची तशीच समजूत करून देतात.येथे सुद्धा मकुठे थांबावेफ हे जर कळले नाही तर त्यामुळे त्या माणसांचा,त्यांच्या मुलाबाळांचा व अखिल समाजाचा दैवदुर्विलास ओढविल्याशिवाय राहणार नाही.त्याचप्रमाणे व्यायाम करताना,खेळताना,भांडताना,व्याख्यान-प्रवचन-कीर्तन करताना,किंबहुना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मथांबायचे कुठेफ हे माणसाला कळणे,त्याच्या व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. नेपोलियन,हिटलर,सद्दाम हुसेन यांना मकोठे थांबायचेफ हे समजले नाही म्हणूनच नेपोलियनला तुरूंगवास भोगावा लागला,हिटलरला आत्महत्या करावी लागली व सद्दाम हुसेनला अपयश,अपकीर्ती व नामुष्की पत्करावी लागली. *थोडक्यात,ज्याच्याजवळ मशहाणपणफ आहे त्यालाच मथांबावे कुठेफ हे अचूक समजते व जीवनात तोच सुखी व यशस्वी होऊ शकतो.
सद्गुरु श्री वामनराव पै.