राज्यात गुरुवारी महापौरपदाची सोडत

नगरविकास विभागाचे पत्र जाहीर; मंत्रालयात प्रक्रिया

मुंबई :
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झाले, तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली. यानंतर आता महापालिकेमधील महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत दि. 22 जानेवारीला काढली जाणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्र्यांच्या (नगरविकास) अध्यक्षतेखाली गुरुवारी परिषद सभागृह, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी अकरापासून आयोजित केली आहे. असे नगरविकास विभागाकडून काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौरपदाची संधी मिळावी, यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्याने सुरू केली जाऊ शकते.

भाजपची जोरदार मुसंडी

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपने एकहाती सत्तेचा सोपान गाठला, तर नागपूरमध्येही भाजपने आपला गड अबाधित ठेवला. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.

The mayoral race will be held in the state on Thursday.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *