नाशिक: प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाचे आरक्षण कोणते निघते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज राज्यातील 29 महापालिका साठी मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. नाशिक महापालिकेचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे. आता महापौर कोण होणार याबाबत कमालीचीउत्सुकता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेत 122 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने72 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिंदे गटाला 26 तर ठाकरे गटाने 15 जागा मिळवल्या, भाजपला निर्विवाद पुन्हा सत्ता दिल्याने नाशिकमध्ये भाजपचा महापौर होणार आहे. महापौर पदासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात येणार आहे.