नाशिक: प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिला राखीव झाल्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या पुरुष मंडळींचा हिरमोड झाला आहे . आता कोणत्या महिलेला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. 50 टक्के आरक्षण असले तरी नाशिक महापालिकेत सर्व पक्षाच्या 67 महिला निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 72 जागा निवडून आलेल्या आहेत. नाशिक महापालिकेचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने या पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. यापूर्वी नाशिक महापालिकेत डॉ. शोभा बच्छाव, रंजना भानसी, नयना घोलप या महिलांनी महापौर पद भूषविलेले आहे. आता नवीन आरक्षण सोडतमध्ये महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे आपले माप कुणाच्या पारड्यात टाकतात याकडे लक्ष लागून आहे, या पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून कुणाला संधी देतील, याकडे लक्ष लागून आहे.