केवल पार्क येथे 10–15 जणांचा कोयता, लाठी, लोखंडी पाईपने हल्ला

 

केवल पार्क येथे 10–15 जणांचा कोयता, लाठी, लोखंडी पाईपने हल्ला; दोघे गंभीर जखमी, एकाला 15 टाके, उपचार सुरू

सातपूर: प्रतिनिधी

अंबड लिंकरोड येथील आझादनगर केवल पार्क परिसरात रस्त्याच्या वादातून दहा ते पंधरा जणांनी एकत्र येत धारदार शस्त्रांनी व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शफिक युनूस कुरेशी (वय ३०, व्यवसाय – भंगार गाडा) आणि युनूस युसूफ कुरेशी (वय ५१, रा. रामकृष्ण नगर, गट नंबर ७८, लिंक रोड, नाशिक) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
शफिक युनूस कुरेशी याला हल्ल्यात तब्बल १५ टाके पडले असून त्यांला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी  सात वाजेच्या सुमारास  केवल पार्क येथे घडली.
या ठिकाणी सुमारे ६०० वार क्षेत्रफळाच्या प्लॉटमधून रस्ता मागणीवरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. हल्लेखोरांनी कोयता, लाठी, लोखंडी पाईप तसेच दगडांचा वापर करत दोघांवर प्राणघातक हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *