मुंबई, ठाणे,रायगडमध्ये बरसल्या सरी
महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण कायम राहिल्याने राज्यातून थंडीचा कडाका जवळपास गायब झाला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ असून हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही तासांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rains arrive in Maharashtra in the dead of winter