वडांगळीत प्रजासत्ताकदिनी 30 कुटुंबांचे गृहस्वप्न साकार

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील वडांगळी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत पूर्ण झालेल्या 30 घरकुलांचा लोकार्पण व लाभार्थी घरकुल प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रामसभेत या लाभार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि घराची प्रतीकात्मक चावी देऊन सन्मानित करण्यात आले.
सरपंच नानासाहेब खुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाची चावी व प्रशस्तिपत्र देत प्रवेश सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे गावातील बेघर असलेल्या 80 हून अधिक कुटुंबाना गेल्या दीड वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत घरकुले मंजूर झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद नाशिक व ग्रामपंचायत वडांगळी यांच्या सहकार्यातून 30 घरकुले पूर्ण झाली आहेत. प्रजासत्ताकदिनी 30 कुटुंबांना हक्काचे पक्के छत मिळाले आहे. या सर्वांना सरपंच नानासाहेब खुळे, उपसरपंच हर्षदा खुळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश घोटेकर, राहूल खुळे, अमोल अडांगळे, रवी माळी, मीनल खुळे, अनिता क्षत्रिय, गायत्री खुळे, योगिता भावसार, लता गडाख, ग्रामपंचायत अधिकारी योगेश चित्ते, सतीमाता-सामतदादा देवस्थानचे विश्वस्त रमेश खुळे, खंडेराव खुळे, दिनकर खुळे, गणेश कडवे आदींच्या हस्ते प्रशस्तिपत्र व चाव्या वाटप करण्यात आल्या. ग्रामरोजगार सेवक अनिल अडांगळे, सुरेश कहांडळ, राहुल खुळे यांनी या सोहळ्यासाठी मेहनत घेतली.

घरकुल लाभार्थ्यांचा प्रवेश सोहळा

प्रातिनिधिक स्वरूपात काही घरकुल लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुदेश खुळे, सरपंच नानासाहेब खुळे, ग्रामपंचायत अधिकारी योगेश चित्ते, ग्रामरोजगार सेवक अनिल अडांगळे, राहुल खुळे, दिनकर खुळे, सुरेश कहांडळ आदींनी नवीन घरकुलांना भेट देत त्या ठिकाणी फीत कापून लाभार्थ्यांचा गृहप्रवेश घडवून आणला. यावेळी घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद दिसत होता.

Home dreams of 30 families come true on Republic Day in Vadangi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *