सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् ….

मुख्यमंत्री, राज्यपालांची स्तब्धता

बारामती :
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि ’दादा’ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना आपले अश्रू अनावर झाले होते. दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण बारामती त्यांच्या दुःखात सहभागी झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बारामती गाठली. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी समोर आलेली छायाचित्रे मन सुन्न करणारी होती. हात जोडून उभ्या असलेल्या सुनेत्रा वहिनींचे सांत्वन करताना दोन्ही नेत्यांनाही आपले दुःख आवरता आले नाही. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्मभूमीत, म्हणजेच बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Sunetra’s sister-in-law joined hands and…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *