नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील प्रख्यात सुलेखनकार नंदू गवांदे यांचे आज तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नंदू गवांदे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने पाच दिवसापूर्वी श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होतो. मात्र आज दुपारी तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे शहरातून शोक व्यक्त केला जात आहे.