दिंडोरी : प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही थांबत नसून, दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याने अनेकांचे जीव घेतले असून, तरीदेखील बिबट्याचा बंदोबस्त अद्यापही सुरूच असून, असे किती बिबटे दिंडोरी तालुक्यात आपलं वास्तव्य टिकून आहेत. त्यातच दिंडोरी येथे दोन दिवसांपूर्वी बदादे वस्ती येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश मिळाले, मात्र हे बिबटे अजून किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न शेतकरी वर्गांमध्ये निर्माण झाला असून, अजूनही बिबट्याचे वरदस्त कमी होताना दिसत नसून, दिंडोरी तालुक्यात कवडासर येथे बिबट्याने दुपारच्या वेळेस एका शेतकर्याच्या शेतात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत तिला आपले कंठस्थान बनविले. त्यामुळे येथील परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याचा तात्काळरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
त्याचबरोबर दिंडोरी तालुका हा आता बिबट्यांचा एक टर्निंग पॉइंट बनलेला असून, राजरोसपणे बिबट्या मानवी वस्तीत येऊन शेतकर्यांच्या पशुधनाचे नुकसान करीत असून, मानवालाही याचा धोका निर्माण झाला आहे. बिबट्याच्या भीतीपोटी शेतकर्यांनी आपल्या शेतातले काम दुपारपर्यंतच करून घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कवडासर येथील काही शेतकर्यांनी सांगितलेले आहे. याबाबत सदरील बिबट्याचा वन विभागाने शोध घेऊन यास पिंजर्यात जेरबद करावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.
Goat killed in leopard attack in Kavdasar