व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव?
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश येत असताना, त्यात आता 16 ग्रामपंचायतींचा कचरा थेट मनपाच्या विल्होळी येथील कचरा डेपोवर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अद्याप या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर दाखल झालेला नसला, तरी लवकरच तसा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे. इगतपुरी व नाशिक या तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा कचरा
महापालिकेच्या विल्होळी भागात आणण्याची तयारी आहे.
मनपाच्या माध्यमातून विल्होळी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. खासगीकरणातून हा प्रकल्प चालवला जात आहे. नाशिकच्या हद्दीलगतच्या गावांत मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभे राहिले आहेत. यामुळे तेथील कचर्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरण हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प तयार होत आहेत. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींकडे त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हा कचरा विल्होळीच्या प्रकल्पावर आणण्याची तयारी आहे. नाशिक व इगतपुरी पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या 16 गावांचा घनकचरा स्वीकारण्याबाबत महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. पण हा प्रस्ताव अपूर्ण असल्याने मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दोन्ही पंचायत समित्यांकडून सविस्तर माहिती मागवली असता, त्यात अनेक ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र व्यवस्थाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ओला व सुका असा एकत्रित कचरा महापालिका स्वीकारणार का? कारण नाशिक महापालिकेकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आजमितीस महापालिकेमार्फत शहरातील कचर्याची पूर्णपणे विल्हेवाट लावली जात नसताना बाहेरील कचर्यामुळे मनपाची व्यवस्था कोलमडू शकते. तसेच कचरा विलगीकरणाचाही प्रश्न उपस्थित होणार आहे.
The burden of waste from 16 gram panchayats within the municipal limits?