जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : मंडळस्तरावर राजस्व अभियानातून प्रश्न निकाली काढणार
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील 21 हजार वनपट्टाधारकांचा संगणकीकृत डेटा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वनपट्टाधारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळणार आहे. केवळ सुमारे 550 तक्रारी अद्याप प्रलंबित असून, त्यावरही कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
गेली अनेक वर्षे वनपट्टाधारकांच्या जमिनी नावावर करण्यासह विविध प्रश्न प्रलंबित होते. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष लक्ष घालून शासन नियमांनुसार 21 हजार वनदाव्यांचा डेटा संगणकीकृत करून नोंदी अद्ययावत केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी बुधवारी (दि. 25) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी त्यांना प्रशासनाने तयार केलेल्या संगणकीकृत डेटाची सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, तालुकास्तरावर पेठ, सुरगाणा आदी भागात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियान’अंतर्गत मंडळस्तरावर शिबिरे घेऊन नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविण्यात येणार आहेत. त्यामुळे वनपट्टाधारकांच्या प्रश्नांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त
होत आहे.
Computerized data of 21 thousand forest lease holders prepared by the administration