ई-चलन लूट, चेकपोस्टबाबत ठोस भूमिका घेण्याचा निर्धार

वाहतूकदार बचाव समितीचा राज्यस्तरीय मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हक्कांसाठी एकत्र येत वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणार्‍या अन्यायकारक फिटनेस फी वाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार व ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या विषयावरही भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. ई-चलन प्रणालीमुळे होत असलेली कथित आर्थिक लूट आणि 45 दिवसांत दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाबाबत वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय, वाहनांवर होणारी चुकीची कारवाई, राज्यातील चेकपोस्ट बंद करण्याची मागणी आणि रिक्षा-टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची गरज यावरही सखोल चर्चा होणार आहे.
प्रसिद्धिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, परिवहन व ट्रॅफिक पोलिस विभागाकडून वाहनधारकांची होत असलेली कथित पिळवणूक व फसवणूक थांबवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील सामाजिक व राजकीय संघटनांनाही या बैठकीस उपस्थित राहून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात मान्य केले. हा लढा फक्त वाहतूकदार म्हणून लढण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित सज्ज आहोत, असा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काळात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, हा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

 

 

Determination to take a firm stand regarding e-challan loot, check posts

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *