नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेची स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे.
स्पर्धेचे यंदा नवे वर्ष आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी दुपारी 12 वाजता उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ आणि परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सोमवार ते बुधवार अशा तीन दिवस महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार्या या
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बुधवारी संध्याकाळी होणार आहे. यावेळी लेखक अभिनेते दीपक करंजकर उपस्थित राहणार आहेत. विनामूल्य असलेल्या या स्पर्धेला नाट्य रसिकांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आनंद जाधव यांच्याशी 9422776384 या क्रमांकावर संपर्क साधावा.
एकांकिकांचे वेळापत्रक : सोमवारी दुपारी साडेबारा वाजता स्पर्धा सुरू होईल. पंचवटी कॉलेजची पोएटिक जस्टिस, नाट्यकट्टा संस्थेची झिरो पॉइंट झिरो, केटीएचएम कॉलेजची तिसरा माणूस आणि श्री थिएटर श्रीरामपूरची अच्छे दिन वो चार दिन या एकांकिका सादर होतील. मंगळवारी सकाळी 11 वाजता स्पर्धा सुरू होईल. त्यात अवर क्रिएशन्सची मृगयाकलह, ज्ञानदीप कला मंच ठाण्याची एक वजा क्षण, निधी आर्ट्स फ्लाईंग क्विन्स, द क्रिएटिव्ह क्रू कल्याणची द क्युरिअस केस ऑफ… पंचवटी कॉलेज परफॉरमिंग विभाग -पाणीपुरी, सौंदर्य निर्मित-कैरी, पॉइव्हेंटिस, घाटकोपर- लाडाची लेक, वर्ड आर्ट फॅक्टरी, लोअर परेल- विटनेस कलरफुल मोंक डोंबिवलीची टिनिटस या एकांकिका होतील.
बुधवारी सकाळी 11 वाजता आपलं घर अहमदनगरची दोरखंड, नाट्यगंधर्वची ऑल्टर, प्राण, मुंबईची जनावर, अभिनय, कल्याणची जीर्णोद्धार, जिराफ थिएटर टिटवाल्याची स्टार, कलासक्त मुंबईची राकस, नाट्यवाडा औरंगाबादची मॅट्रिक, आणि स्वामी नाट्यगण डोंबिवलीची भगदाड ही एकांकिका सादर होईल. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.