शहरात कोम्बिंग ऑपरेशन

 

नाशिक : वार्ताहर

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिक शहरातील गुन्हेगारांवर वचक बसावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशनला कालपासून सुरुवात केली आहे.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसरूळ पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार, हिस्ट्रीशीटर, फरार, वॉरंटमधील व इतर गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला असून, यामध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातून 21 तडीपार तपासले. त्यापैकी 3 तडीपार मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 18 हिस्ट्रीशीटर गुन्हेगार तपासले. त्यापैकी 10 हिस्ट्रीशीटर गुन्हेगार मिळून आले.

संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. अवैध शस्त्राचा शोध घेतला. तसेच गुन्ह्यातील 6 संशयितांना तपासले. तसेच वेलेबल/नॉनवेलेबलमधील 10 संशयितांना तपासले. त्यापैकी 6 तडीपार मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. एकूण 9 गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 2 सहा. पोलीस आयुक्त, 21 पोलीस अधिकारी, 110 पोलीस अंमलदार तसेच दंगल नियंत्रण पथक, नलद प्रतिसाद पथक यांनी कारवाईत सहभाग घेऊन कोम्बिंग ऑपरेशन मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *