‘वन प्लस’ ब्रॅण्ड लवकरच बंद होणार?

एप्रिलपासूनच जागतिक बाजारातून गाशा गुंडाळण्याची शक्यता

नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन उद्योगातील एकेकाळचा ‘फ्लॅगशिप किलर’ म्हणून ओळखला जाणारा वन प्लस ब्रँड आता जागतिक बाजारपेठेतून एप्रिल-2026 पासूनच माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त तंत्रज्ञान विश्लेषकांनी दिले आहे. मूळ कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्स, जी ऑप्पो, विवो आणि रिअलमी यांचीही मालक आहे, तिने जागतिक स्तरावर ब्रँड्सची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. वन प्लस ला स्वतंत्र ओळख देण्याऐवजी ऑप्पोच्या छत्राखाली विलीन करण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील अनेक बाजारांतून वन प्लसचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.
वन प्लसच्या या संभाव्य अस्तानामागे अनेक कारणे आहेत. 2014 साली नेचर सेटल या घोषणेसह धमाकेदार प्रवेश केलेल्या वन प्लस ने सुरुवातीला इंव्हाईट ओन्ली मॉडेलने जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींना वेड लावले होते. पण नंतरच्या काळात ऑप्पोशी विलीनीकरण, ऑक्सिजन ओएसची घसरती गुणवत्ता, वाढत्या किमती आणि सॅमसंग व शाओमी यांच्याशी वाढती स्पर्धा यामुळे वन प्लसची वेगळी ओळख हळूहळू पुसट होत गेली. जे वापरकर्ते वन प्लस साठी निष्ठावान होते, त्यांनी हळूहळू पाठ फिरवली. जागतिक बाजारात ब्रँडची विश्वासार्हता टिकवणे बीबीके कंपनीला परवडेनासे झाले. भारतीय ग्राहकांसाठी हे वृत्त महत्त्वाचे आहे. भारतातील स्थिती तूर्त स्पष्ट नाही. काही अहवालांनुसार, भारत आणि चीनमध्ये ब्रँड काही काळ सुरू राहू शकतो. पण जागतिक स्तरावर वन प्लस संपले, तर सॉफ्टवेअर अपडेट्स, वॉरंटी सेवा आणि स्पेअर पार्ट्स यांबाबत विद्यमान वापरकर्त्यांना अडचणी येण्याची भीती आहे. नेचर सेटल म्हणणारा ब्रँड स्वतःच आपल्या अस्तित्वाशी तडजोड करत असल्याचे हे चित्र स्मार्टफोन उद्योगातील बेभरवशाच्या स्पर्धेची ही एक करुण आठवण ठरेल.

Will the ‘One Plus’ brand be discontinued soon?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *