खरातचा कथित पीए म्हणतो, ’माझा संबंध नाही, स्वयंसेवक होतो’

नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत वृत्तवाहिन्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही. मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही, असा दावा हिंगे यांनी केला आहे.
रमेश हिंगे यांनी सांगितले की, ते पेशाने शिक्षक आहेत. रविवारी जेव्हा शाळेला सुट्टी असायची, तेव्हा मी श्रद्धेपोटी मंदिरात ’स्वयंसेवक’ म्हणून जात होतो. त्यापलीकडे माझा खरातच्या कोणत्याही अघोरी कृत्यांशी किंवा व्यवहारांशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यापासून हिंगे फरार असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. मात्र, त्यांनी समोर येऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
खरातच्या ’ओकस प्रॉपर्टीज’ आणि इतर व्यवहारांत हिंगे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, हिंगे यांनी स्वतःहून समोर येत आपली बाजू मांडल्याने आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस आता हिंगे यांच्या या दाव्याची शहानिशा करणार आहेत. खरातच्या काळ्या साम्राज्यात त्यांचा खरोखरच सहभाग होता की ते केवळ एक भक्त होते, हे तपासाअंती स्पष्ट होईल.

Kharat’s alleged PA says, ‘I have no connection, I was a volunteer’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *