महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या खरातची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह

नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. यादरम्यान पोलीस कोठडीची हवा खाणार्‍या अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे.
भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या आठ गुन्ह्यांपैकी सात गुन्हे महिला अत्याचारासंदर्भात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महिलांव्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पीडित महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत.

Kharat, who sexually abused women, tests negative for HIV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *