सिडको : विशेष प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिचा मानसिक छळ व शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आशुतोष महेंद्रसिंग पाटील याच्यासह त्याचे वडील चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग पाटील व बहिणीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. संशयिताने पीडितेच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. नोव्हेंबर 2023 पासून आतापर्यंत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडिता याबाबत जाब विचारण्यासाठी संशयिताकडे गेली असता त्याने लग्नास नकार दिला. यावेळी त्याचे वडील व बहिणीने पीडितेला शिवीगाळ करत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे करीत आहेत.
Former corporator’s son sexually assaults young woman