टोलनाक्यावर आजपासून रोख रक्कम बंद

नवी दिल्ली :
देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10 एप्रिल 2026 पासून टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, आता टोलप्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद केली जाणार असून, डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.
आजपासून टोलनाक्यांवरील ‘कॅश लेन’ पूर्णपणे बंद केल्या जातील. जर एखाद्या वाहनधारकाकडे वैध फास्टॅग नसेल किंवा डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर त्याला टोलप्लाझावरून पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. नवीन नियमांनुसार, अनेक महामार्गांवर ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ लागू केली जात आहे. टोलप्लाझावर थांबण्याची गरज आता उरणार नाही. जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन करून टोलनाक्यावर गोंधळ घातला किंवा रोख रकमेचा आग्रह धरला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच, अशा वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकारही प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

Cash banned at toll plazas from today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *