साप्ताहिक राशिभविष्य

दि. 12 ते 18 एप्रिल 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : मन प्रसन्न राहील
या सप्ताहात शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, बुध, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. शनिची साडेसाती सुरू आहे. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना मनस्ताप देणार्‍या घटना घडतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. खर्च वाढतील. शेअरमधील गुंतवणूक अडचणीत येईल. अचानक धनलाभाचे योग यावेत.
मिथुन : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांनी व व्यापारी, व्यावसायिकांनी स्वभावात मनमिळावूपणा आणणे गरजेचे आहे. संयम पाला, प्रकृती चांगली राहील.
कर्क : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या भाग्योदयाच्या घटना घडतील. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. नवीन घर, वाहन खरेदीसां पावले उचलाल. आरोग्याची काळजीघ्या.
सिंह : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. मंगळ, बुध, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृतीची काळजी घ्या. अजिबात दुर्लक्ष करू नका. कुपथ्य टाळा. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.
कन्या : समिकरणे जुळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राह, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. खर्च वाढतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामास विलंब होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रकृती जपा.
वृश्चिक : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमरे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळा. नोकरदारांवर अकारण संकट येणे शक्य आहे. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. धाडसाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. प्रकृतीची काळजी घ्या. दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कुपथ्य टाळा.
धनु : आर्थिक सुधारणा
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. अडकलेले पैसे वसूल होतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. नोकरदारांना व व्यापारी, व्यावसायिकांना वादाला तोंड द्यावे लागेल. अविवाहितांचे विवाह जमतील. मनाप्रमाणे वधूवर मिळतील. प्रकृतीबाबत दक्षता बाळगा.
मकर : अडचणी दूर होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे धाडस यशस्वी होईल. शेअरमध्ये गुंतवणूक सावधपणे करा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
कुंभ : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील.
मीन : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मनावर संयम ठेवणे आवश्यक ठरेल. वादविवाद टाळा, शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात विलंब होईल. अडचणी येतील. नोकरदारांच्या व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी सौम्य होतील. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *