ऑफिसला जाऊन काय करायचा माहिती नाही

खरातच्या सासूचा माध्यमांशी बोलताना दावा

नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. आता 18 एप्रिलपर्यंत त्याला चौथ्या गुन्ह्यात कोठडी देण्यात आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना अजूनही पोलिसांना सापडलेली नाही. खरातच्या सासूने माध्यमांशी बोलताना कल्पना कुठे आहे हे माहीत नाही, पण खरात ऑफिसला जाऊन नेमका काय करायचा? हे माहीत नाही, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही, असे पार्वती शिंदे यांनी सांगितले.
अशोक खरात काय करायचा माहीत नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौकशी करत आहेत, मला माहिती नाही. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही, मला नीट बोलताही येत नाही, असेही पार्वती शिंदे यावेळी म्हणाल्या.
अशोक खरातने केलेल्या कारनाम्याबद्दल माध्यमांनी तिला विचारले असता, तो ऑफिसला जात होता. मात्र, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हते, असा दावा पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अशोक खरातला शिक्षा व्हायला हवी की नाही, असा प्रश्न विचारल्यास शिक्षा नाही व्हायला हवी, पण त्याला आता कोण सोडवणार? असे त्या माध्यमांशी बोलताना दिसून येते.

भक्तांच्या आधार, पॅनचा वापर बँकेत खाते उघडण्यासाठी

शिर्डी : भोंदू खरातकडे येणार्‍या भक्तांच्या पॅन व आधारकार्डाचा वापर बँक, पतसंस्थेत खाते उघडण्यासाठी खरातने केल्याची शक्यता आहे. खरातने समता पतसंस्थेत 57 बनावट खाती उघडल्याचे समोर आले आहे. भक्तांकडून घेतलेल्या पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पॅन कार्डवरील सहीशी, स्वाक्षरीशी साम्य साधत खाती उघडल्याचा प्रकार समोर येत आहे.
भोंदू खरातने या पतसंस्थेत उघडलेल्या 35 खात्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. 90% स्वाक्षर्‍या या संशयास्पद असल्याचे तपासात समोर आले आहे. भोंदू खरातने देवदर्शनाच्या नावाखाली आधार व पॅन कार्ड गोळा केल्याचे समोर आले आहे. बनावट सह्यांच्या आधारे मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

I don’t know what to do when I go to the office.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *