किचन टिप्स

लोणचे बरणीत भरण्यापूर्वी तळाशी तीन-चार चमचे व्हिनेगर घातल्यास लोणच्यात बुरशी येत नाही.
लोणच्यात जास्त झालेला तेलाचा वापर पराठे करताना करावा. पराठे चांगले होतात.चिवड्याच्या फोडणीत आले खिसून घातल्यास चांगली चव येते.
तांब्यात पाणी घेऊन त्यात कोथिंबीरीची जुडी मुळासकट उभी ठेवल्यास ती दोन दिवस टिकते. भाजीत कांदा घातल्यास त्यात हिंग घालू नये.भाजीला उग्रपणा येतो.
पराठे करताना कणकेत थोडा मैदा घालावा. पराठे मऊ व खुसखुशीत होतात.
भाकरीचा पिठाचे धान्य नवे असल्यास त्यात थोडे मोहन घालावे.
पुरणपोळीचा पुरणात निम्मा गूळ व निम्मी साखर घालावी.पुरणपोळी जास्त चविष्ट होते व रंगही छान येतो.वर्षभराचा गरम मसाला एकदम करून ठेवल्यास त्यास दमटपणा येऊ नये यासाठी त्यात हिंगाचा खडा टाकून ठेवावा. नारळ जास्त काळ टिकण्यासाठी उभा करून ठेवावा.फोडणी दिल्यानंतर त्यावर लगेच झाकण ठेवावे. पदार्थांची रुची अधिक वाढते.
डोसे करताना पिठात साबुदाण्याचे पीठ घातल्यास डोसे कुरकुरीत होतात.
मेदू वडे करताना पिठात थोडा बारीक रवा दोन चमचे तांदळाचे पीठ मिसळावे. वडे कुरकुरीत होतात
लोणी करताना त्यात एक- दोन लवंगा टाकल्यास तुपास आंबटपणा येत नाही.
शेव तयार करण्यासाठी हरभर्‍याची डाळ दळायला देताना त्यात मूठभर चवळी टाकावी. शेव खुसखुशीत होते.
साखरेचा किंवा गुळाचा पाक चांगला होण्यासाठी त्यात थोडेसे तूप घालावे.
खार्‍या बिस्किटांचा चुरा राहिल्यास त्यात साखर व वेलदोडे पूड घालून मिक्सरमधून काढावे. किंचित दूध व साजूक तूप घालून लाडू वळावेत.
विरजण लावण्याकरता दही नसेल तर चांदीचे नाणे अर्धा-पाऊण तास ठेवावे. दही लागते.सुरळीच्या वड्या करताना एक वाटी बेसन पिठाला दोन चमचे मैदा घालावा.वड्या चांगल्या होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *