इनोव्हा कारची काच फोडून चोरी करणारे जेरबंद

पंचवटी : प्रतिनिधी
स्वामिनारायण मंदिरासमोरील पार्किंगमध्ये गाडी पार्क करून
दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या इनोव्हा कारची काच फोडून चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीस आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे.
सुशांत प्रकाश अडसुळे (वय 36, रा. 3/1 गणेशमंदिर को-ऑ. सोसायटी, गणेशनगर, दिवा पूर्व, ठाणे) दि. 26 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 ते 8.45 वाजेच्या सुमारास त्यांची इनोव्हा कार (एमएच 01-वायए 2229) ही स्वामिनारायण मंदिरासमोरील पार्किंगमध्ये पार्क करून दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेला लिनोवो कंपनीचा लॅपटॉप, एअरटेल कंपनीचे डोंगल व पांढर्‍या रंगाचे ब्लुटुथ हेडफोन चोरून नेले होते. त्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा शोध घेत असताना आडगाव गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख हवालदार दादासाहेब वाघ, इमरान शेख, अंमलदार शक्ती पेंढारकर, सुमित शिंदे यांनी घटनास्थळावर जाऊन संशयितांचा शोध घेतला. हवालदार दादासाहेब वाघ, इमरान शेख यांना गुन्ह्यातील संशयित पंचवटी कॉलेजकडून स्वामिनारायण मंदिराकडे जाणार्‍या टी पॉइंटजवळ संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना दिली. त्यानुसार आडगाव गुन्हेशोध पथक याठिकाणी पोहोचले. तेथे उभ्या असलेल्या संशयितांना पोलीस वाहन येण्याची चाहूल लागताच ते पळून जात असताना त्यांना काही अंतरावर पकडले. राहुल जालिंदर सासे (वय 26,रा. सावरकर चौक, भोई गल्ली, जुने नाशिक), कार्तिक अशोक नाडार (वय 20, रा. आझाद चौक, शिंपी गल्ली जुने नाशिक) यांच्याकडे चौकशी केली असता, ते उडवाउडवीचे उत्तर देत होते.
त्यांना आडगाव पोलीस ठाण्यात नेले असता, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख तपास करत आहेत.
ही कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, हवालदार दादासाहेब, वाघ, इम्रान शेख, नीलेश काटकर, शिवाजी आव्हाड, मनोज परदेशी, अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, नंदू साळुंखे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, अनिल सोनवणे, हनुमान कोरडे, योगेश गावित, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव यांनी केली आहे.

Man arrested for stealing Innova car by breaking its window

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *