सिडको : विशेष प्रतिनिधी
गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चार बैलांसह पिकअप वाहन असा एकूण एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गणेश माऊंजी गवते (वय 36, रा. हिमटपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) आणि मनोहर गोविंद गांगुर्डे (वय 35, रा. हिरवेपाटील पाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एमएच 15- एफव्ही 7583 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून चार बैलांना दोरीने घट्ट बांधून, श्वास घेण्यासाठी पुरेशी जागा न देता तसेच चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे वाहतूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या कारवाईत चार गोवंश बैल आणि पिकअप वाहन असा एकूण एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Animals being taken for slaughter caught; case registered