सिडको : विशेष प्रतिनिधी
भाडेकराराची मुदत संपल्यानंतर घर खाली करण्यास सांगितल्याच्या कारणावरून महिलेला धक्का देत शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या भाडेतत्त्वावरील घराचा करार संपल्याने भाडेकरू खान मझहर सिद्दिकी (वय 25), त्याची आई परवीन खान आणि मुलगी रोझमीन खान यांना घर खाली करण्यास सांगण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी झालेल्या वादातून खान मझहर सिद्दिकी याने फिर्यादीला जोराचा धक्का दिल्याचा आरोप आहे. तसेच शिवीगाळ करून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यानंतर परवीन खान व रोझमीन खान यांनीही मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Woman beaten up for asking her to vacate house