खमताणे : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस वाढणार्या किराणा दरांमुळे सामान्य कुटुंबांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. तेल, डाळी, साखर, तांदूळ, गहू, मसाले तसेच रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह किरकोळ व्यापार्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. वाढत्या किमतीमुळे घर खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होत चालले आहे.गेल्या काही महिन्यांत किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील दरवाढ यामुळे किरकोळ बाजारातही महागाई वाढली आहे.
गेल्या काही महिन्यांत किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील दरवाढ यामुळे किरकोळ बाजारातही महागाई वाढली आहे.पूर्वी हजार रुपयांत भरून येणारी किराण्याची पिशवी आता अर्धीही भरत नसल्याची प्रतिक्रिया अनेक गृहिणींनी व्यक्त केली आहे. वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर आणि त्यातच किराणा सामानाच्या किमतींनी सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे.
कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वाधिक फटका बसत असून, “पगार तेवढाच पण खर्च दुप्पट” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बाजारातील वाढते होलसेल दर, वाहतूक खर्च आणि इंधन दरवाढ यामुळे किराणा वस्तू महाग होत आहेत. सामान्य माणूस महागाईच्या विळख्यात अडकला असून, आता तरी सरकारने लक्ष द्यावे, अशी भावना सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी व्यक्त
केली आहे.
वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर आणि त्यातच किराणा सामानाच्या किमतींनी सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे. कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वाधिक फटका बसत असून, पगार तेवढाच पण खर्च दुप्पट, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. – हरिअण्णा जाधव, कृउबा समिती, उपसभापती सटाणा
Inflation has broken the backs of ordinary citizens in rural areas!