सातपूरला गोणीमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

सातपूर: प्रतिनिधी

सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कामगार नगर साईबाबा काळे नगर मंदिर परिसरात एका  गोणीत अत्यंत क्रूरपणे कोंबलेला व पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील एका सुमारे 25 वर्षाचा तरुणाचा मृतदेह आढळला.
आज कामगार नगर साई मंदिर परिसरात येणारा जाणारे नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना अचानक परिसरात तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, त्यांना एक संशयास्पद गोणी दिसून आली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिस उपआयुक्त किशोर काळे. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी.पोलीस निरीक्षक सचिन खैरनार. घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असून, त्यातून तीव्र दुर्गंधी सुटलेली होती. मृतदेह अनेक दिवसांपूर्वीचा असावा, तसेच मृत  तरुण 20 ते 25 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *