नाशिक: प्रतिनिधी
विधान परिषदेच्या नाशिक च्या जागेवर महायुती च्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीते यांनी पराभव केला. विजयानंतर गीते समर्थकांनी जल्लोष केला दरम्यान, दराडे यांनी पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला.