चांदवड ः वार्ताहर
महविकास आघाडीतर्फे कांद्याला हमीभाव व इतर मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, डॉ.सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली काल (दि. 2) रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिरीष कोतवाल, नितीन आहेर, सयाजीराव गायकवाड, विजय जाधव, संजय जाधव, यू. के. आहेर, भास्करराव शिंदे, पठाण आदींची भाषणे झाली. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत शेतकर्यांना आश्वासन दिले होते की, कांद्याला हमीभाव देऊ परंतु भाव दिला नाही. रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढले आहेत, ते कमी करण्यात यावे. घरगुती गॅसचे भाव कमी करण्यात यावे, डिझेल, पेट्रोलचे भाव कमी करण्यात यावे. खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत, ते कमी करण्यात यावे. गव्हाची निर्यात बंद केली आहे, ती पुन्हा चालू करण्यात यावी. यावेळी चांदवड तालुका कॉंग्रेस अध्यक्ष संजय जाधव, चांदवड शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर, विजय जाधव, सुनील कबाडे, शिवाजी कासव, प्रकाश शेळके, नवनाथ आहेर, कॉ. भास्करराव शिंदे, वकील दत्तात्रेय गांगुर्डे, पठाण साहेब, यू. के. आहेर, रघुनाथ आहेर, कैलास सोनवणे, सुभाष जाधव, उत्तमराव धोमरे, सागर निकम, अल्ताब तांबोळी, मतीन घाशी, उत्तमराव ठोंबरे, दत्तात्रय वाकचौरे, संदीप उगले, भाऊसाहेब शेलार तसेच चांदवड तालुक्यातील असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.